Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ payment increase two nirnay publish ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ संदर्भात आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी दोन महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आले आहे . सदर निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील दोन्ही निर्णय खालील प्रमाणे पाहूयात ..
आदिवासी विकास विभाग अंतर्गत दिनांक 22 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय नुसार आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर सुधारित मानधन लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
यामध्ये प्राथमिक शिक्षण सेवकांना 16 हजार रुपये , माध्यमिक शिक्षण सेवकांना 18 हजार रुपये तर , उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना 20 हजार रुपये इतके सुधारित मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे . सदर सुधारित मानधन 01 जानेवारी 2023 पासून लागू करण्याचे निर्देश सदर शासन निर्णय नुसार देण्यात आली आहे . या संदर्भातील सविस्तर निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता ..
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतील कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनामध्ये 1 हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे . आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या 2500/- प्रतिमहा मानधनामधील राज्य शासनाच्या हिश्यामधील एक हजार रुपये प्रतिमा इतके वाढ करून प्रतिमा हा 3,500/- रुपये इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे . या संदर्भातील निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता..