Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean & Cotton madat nidhi , price info ] : राज्यातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000/- रुपये मदत निधी देण्याचे राज्य शासनांने निर्णय घेण्यात आले आहेत . परंतु या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार ? सोयाबीन / कापसाच्या बाजाराभावामध्ये वाढ कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत .

सध्या राज्यात फक्त लाडकी बहीणचीच चर्चा सुरु आहे , परंतु राज्य शासनांने जाहीर केलेल्या सोयाबीन / कापुस उत्पादकांना प्रति हेक्टरी 5,000/- रुपयांची मदत निधी कधीपर्यंत मिळणार असा सवाल राज्य शासनांस विचारला जात आहे . या संदर्भात अद्याप पर्यंत कोणताही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नसल्याने , सदर मदत निधी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे .

राज्य शासनांच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे कि , राज्यातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ( 2 हेक्टरच्या मर्यादेत ) प्रति हेक्टर 5,000/- रुपये मदत निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत . सदर मदत निधी देण्याकरीता सरकारला कोणत्याही प्रकारची नविन आकडेवारी गोळा करण्याची आवश्यकता नाही . तरीदेखिल सरकार कडून विलंब होत आहे .

सोयाबीन / कापसाच्या बाजारभावांमध्ये परत उतरती कळा : सोयाबीनला प्रति क्विंटल 4800/- पर्यंत बाजार भाव मागील आठवड्यात मिळाला , परंतु आता सोयाबीनला चक्क 4100/- रुपये बाजारभाव मिळत आहे , यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये चक्क उतरती कळा सुरु झालेली आहे .

तर मागील महिन्यांत कापसाला 7400/- रुपये पर्यंत बाजारभाव मिळत होता , आता कापसाला 7000/- रुपये इतकेच बाजारभाव मिळत आहे , यामुळे निवडणुकीच्या नंतर शेतीमालाच्या किंमतीमध्ये चक्क उतरती कळा दिसून येत आहेत .आता सोयाबीन व कापसाच्या किंमतीमध्ये वाढ , विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता पुर्वीच होण्याची शक्यता आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *