Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state rain update red alert ] : राज्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये राज्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे , या कालावधीत राज्याला काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
कालपासुन राज्यांतील कोकण विभागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून , सध्या पावसाची तिव्रता अधिकच वाढली असून , पुढील 24 तासांमध्ये सदर तिव्रता अधिकच वाढणार असून सदर भागांना भारतीय हवामान खात्यांने पावसाचा रेडे अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . यांमध्ये राज्यातील विदर्भ विभाग , कोकण विभागांसह पश्चिम किनारपट्टी क्षेत्रांचा समावेश आहे .
सातारा , कोल्हापुर , पुणे , मुंबई शहर , मुंबई उपनगर हे जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे . देशात उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून , सद पट्टा हा अंतर्गतच्या भागांमध्ये पुढे सरकताना दिसुन येत आहे . यांमुळे राज्यात दिनांक 21 जुलै पर्यंत राज्यातील कोकण , पश्चिम किनारपट्टवरील भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे .
सदर भागांमध्ये काळ्या ढगांचा मोठी दाटी पाहायला दिसुन येत आहेत . सदर पावस पश्चिम महाराष्ट्र भागांमध्ये पुढे सरकणार असून , या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , यांमध्ये सातारा , सांगली , नगर , पुणे , नाशिक , नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे .
विदर्भ विभागाला पावसाचा रेड अलर्ट जारी : विदर्भ विभागांमध्ये विजेच्या कडाक्यांसह मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्यांकडून जारी करण्यात आला आहे . विदर्भ विभागांमध्ये नागपुर जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झालेली आहे , तर चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये ढगफुटीची स्थिती निर्माण झालेली आहे . विदर्भातील जिल्ह्यांना पुढील 48 तासापर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
याशिवाय मराठवाडा विभागांमधील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तर राज्यात पुढील 48 तासांमध्ये ठाणे , रायगड , सिंधुदुर्ग , पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी जिल्ह्यास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !