Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state new rain update ] : राज्यांमध्ये मराठवाडा व विदर्भांमध्ये पावसाचा जोर मंदावला असून , पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढला आहे . दिनांक 16 जुलै पासुन कोकणांमध्ये मुसळधार पाऊसाचा सुरुवात झालेली आहे .
दिनांक 16 जुलै नंतर मराठवाडा , विदर्भांमध्ये पावसाला उतरता कळा लागल्या असून , सदर पावसाचा जोर आता कोकणांमध्ये अधिक वाढला आहे , कोकणावरुन पाऊस घाटमाथ्यावरुन पश्चिम महाराष्ट्रांमध्ये पुढे सरकत आहे .मागील 3-4 दिवसांमध्ये विदर्भ , मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे , यामुळे यंदाच्या वर्षी विदर्भ , मराठवाड्याला चांगला दिलासा मिळाला आहे .
मराठवाड्यातील बीड , जालना , नांदेड , परभणी , लातुर , छ.संभाजीनगर , धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मागील वर्षांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे . तर यंदाच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील नगर , नाशिक , पुणे , नंदुरबार सातारा , सांगली या जिल्ह्यांमध्ये दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे . परंतु आता या भागांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
राज्यांमध्ये 29 जुलै ते 01 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज : हवामन खात्यांकडून मिळालेल्या अंदाजानुसार दिनांक 29 जुलै ते 01 ऑगस्ट पर्यंत मोठा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . यांमध्ये दिनांक 29 जुलै 2024 रोजी कोकणातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या दरम्यानच्या कालावधीमध्ये , कोकण किनारपट्टीवर जोराचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
30 जुलै : 30 जुलै रोजी कोकण , मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . तर 30 जुलै रोजी पाऊस घाटमाथ्यावरुन पुढे सरकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
31 जुलै : 31 जुलै रोजी राज्यातील कोकण किनारपट्टीवर सर्व जिल्ह्यांमध्ये सुसाग वाऱ्यासह पावसाचा शक्यता वर्तविण्यात आली आहे , याशिवाय मध्य महाराष्ट्र , मराठवाडा व विदर्भ अशा राज्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम , तुरळक स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
01 ऑगस्ट : 01 ऑगस्ट रोजी मात्र कोकणांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , तसेच मध्य महाराष्ट्र , विदर्भांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !