Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ india post office best investment plan for sinior citizen & women ] : भारतीय डाक विभाग मार्फत ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी खास बचत योजना राबविण्यात येतात , सदर योजनेवर केंद्र शासनांकडून इतर योजनांपेक्षा अधिक व्याज दिले जाते , अशा योजनांबद्दल सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात सदर योजनांच्या माध्यमातुन मुदत ठेवीवर 8.2 इतका वार्षिक व्याजदर दिला जातो . तर यांमध्ये किमान 1000/-तर कमाल 30 लाख रुपये पर्यंतची गुंतवणुक करु शकतो .
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र : ही योजना खास महिलांसाठी लाँच करण्यात आलेली आहे , सदर योजना अंतर्गत किमान 1000/- रुपये तर कमाल 200,000/- रुपये इतकी गुंतवणुक करता येईल . सदर योजना अंतर्गत गुंतवणुकीवर 7.5 टक्के इतका व्याजदर दिला जातो . सदर योजना अंतर्गत बचत मुदत ही 2 वर्षाची आहे .
दरमहा उत्पन्न योजना ( Monthly Income Scheme ) : दरमहा उत्पन्न योजना अंतर्गत किमान 1000/- रुपये तर कमाल 9 लाख रुपयांची गुंतवणुक करता येते . या योजना अंतर्गत 7.4 टक्के इतका व्याजदर मिळतो . आपण जर या योजना अंतर्गत 5 लाख रुपये गुंतविल्यास , आपणांस दरमहा 3,086 रुपये दरमहा मिळतील . तर 9 लाख रुपये गुंतविल्यास , दरमहा 5,550/- रुपये दरमहा उत्पन्न मिळेल .
सुकन्या योजना : सदरची योजना खास लहान मुलींसाठी तयार करण्यात आलेली आहे , 01 वर्षे ते 10 वर्षे पर्यंतच्या मुलींच्या नावे सदर योजना काढता येते . यांमध्ये 15 वर्षे गुंतवणुक केल्यास मुलीच्या 21 वर्षानंतर सदर रक्कम व्याजासहित मिळते . आपण जर दरमहा 2000/- गुंतवणुक केल्यास आपणांस 21 व्या वर्षानंतर 11,09,218/- रुपये इतकी रक्कम मिळेल . या योजना अंतर्गत गुंतवणुकीवर 8.2 टक्के इतका व्याजदर दिला जातो .
भविष्य निर्वाह निधी ( PF ) : भविष्य निर्वाह निधी या योजनेमध्ये कोणताही नागरिक ( वयाचे 18 वर्षे पुर्ण झालेला ) गुंतवणुक करु शकतो . सदर योजनाची परिपक्वतेची मुदत ही 15 वर्षाची आहे . तर यांमध्ये दरमहा गुंतवणूक करावी लागते , वार्षिक 150,000/- रुपये वार्षिक मर्यादेत गुंतवणुक करावी लागते . आपण जर या योजनांमध्ये दरमहा 12500/- रुपये गुंतवणूक केल्यास , 15 वर्षानंतर एकुण 39,44,600/- इतकी रक्कम मिळेल .