Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state next four days rain update news ] : राज्यांमध्ये पुढील दिवस पाऊसाची स्थिती कशी असेल , कोणत्या भागांमध्ये पाऊस वाढेल , तर कोणत्या भागांमध्ये पावसाची जोर कमी होणार याबाबत सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

हवामान खात्यांकडून दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील ज्या भागांमध्ये पावसाचे अधिक जोर होता अशा भागांमध्ये आता पावसाचा जोर कमी होणार आहे , यांमध्ये विशेषत : मराठवाडा विभाग व खानदेश तसेच मध्य मराराष्ट्रांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

आज या भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज : राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील काही ठिकाणी आज दिनांक 17 जुलै रोजी अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . त्याचबरोबर संपुर्ण विदर्भांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे . तर आजपासुनच राज्यातील खान्देश , मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

18 जुलै / उद्या या ठिकाण पडणार पाऊस : उद्या दिनांक 18 जुलै 2024 रोजी राज्यातील रत्नागिरी , कोल्हापुर , सातारा ,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिजोराचा पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे . याशिवाय ठाणे , पालघर , पुणे , रायगड , त्याचबरोबर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यांकडून जारी करण्यात आला आहे .

19 जुलै रोजीचा अंदाज : राज्यांमध्ये दिनांक 19 जुलै रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . याशिवाय मराठवाडा , खानदेशातील काही ठिकाणी तुरळक व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

दिनांक 20 जुलै रोजीचा अंदाज : तर दिनांक 20 जुलै वार शनिवारी रोजी राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्र , खान्देश , मराठवाडज्ञ व विदर्भातील बऱ्याच ठिकाणी जोराचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *