Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ hra allowance increase shasan nirnay ] : राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने मंजुर करणेबाबत , वित्त विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयाच्या अनुषंगाने डी.ए चा दर हा 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , HRA मध्ये वाढीची तरतुद आहे . याबाबतचा वित्त विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात …
वित्त विभागाच्या दिनांक 05 फेब्रुवारी 2019 रोजीच्या निर्णयानुसार सातवा वेतन आयोगात महागाई भत्ताच्या वाढीनुसार घरभाडे भत्ता मधील वाढीबाबत , तरतुद करण्यात आलेली आहे . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि X , Y , Z वर्गीकृत शहरांना किमान 5400/- रुपये , 3600/- रुपये व 1800/- रुपये इतका घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .
7 वा वेतन आयोगांमध्ये डी.ए चा दर ज्यावेळी 25 टक्के झाले त्यावेळी घरभाडे भत्ता मध्ये अनुक्रमे 27 टक्के , 18 टक्के , 9 टक्के अशी वाढ मंजुर करण्यात आली .तर ज्यावेळी डी.ए चे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक होईल , त्यावेळी वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30 टक्के , 20 टक्के व 10 टक्के वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजुर करण्याची तरतुद नमुद करण्यात आलेली आहे .
सदर निर्णयांनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा डी.ए चे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक होईल , त्यावेळी घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा होईल . सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने जानेवारी 2024 पासुन डी.ए लागु करण्यात आला आहे . आता पुन्हा जुलै महिन्यातील डी.ए वाढ बाकी आहे , त्यानंतर डी.ए चे दर हे 50 टक्के पार होईल , त्यावेळी वरील निर्णयानुसार , सुधारित घरभाडे भत्ता लागु होतील .
म्हणजेच जुलै 2024 पासुन राज्यातील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30 टक्के , 20 टक्के व 10 टक्के घरभाडे भत्ता लागु करण्यात येईल ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.