Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state rain update upto 18 july ] : राज्यांमध्ये दिनांक 18 जुलै पर्यंत ढगफुटीमुळे पुर सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे . राज्यांत बऱ्याच दिवसांपासुन काही भागांमध्ये मोठा पाऊस झालेला नाही , आता पुन्हा एकदा पावसाची मोठी कमबॅक होणार आहे .
जुलै महिन्याचा पहिला आठवडा हा कोरडाच गेल्यानंतर आता राज्यांमध्ये पावसाची मोठी सुरुवात होणार आहे . तर राज्यतील काही जिल्ह्यांमध्ये पुर सदृश्य स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला आहे .
या भागांमध्ये पडणार जोरदार पाऊस : राज्यातील दक्षिण कोकण भागातील रायगड, रत्नागिरी त्याचबरोबर पुणे , सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , या जिल्ह्यांना हवामान खात्यांकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे . या भागांमध्ये पुढील 2 दिवसात ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
या शिवाय राज्यातील ठाणे , सिंधुदुर्ग तसेच मराठवाडा विभागातील छ.संभाजीनगर , अहमदनगर , परभणी , जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्यांकडून जारी करण्यात आला आहे .
तसेच विदर्भ विभागांमध्ये पुढील दोन दिवसात वाशिम , यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . याशिवाय उद्या कोल्हापुर , सातारा , नाशिक , पुणे या जिल्ह्यात तसेच विदर्भ विभागांमध्ये पावसाचा जोर कायम असणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
तर मराठवाडा विभागांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . एकंदरीत राज्यात पुढील 2 दिवसांमध्ये चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .