Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee da vadh & HRA increase news ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा डी.ए वाढ करण्यात येते , केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील डी.ए वाढ लागु केल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे .
वर्षातील दुसऱ्यांदा डी.ए वाढ ही जुलै महिन्यांमध्ये करण्यात येते , सदर डी.ए वाढीबाबत आत्ताची मोठी अपडेट येत आहेत . महागाई भत्ताचे दर हे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे जाहीर करण्यात येतात , सध्या माहे मे 2024 पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत . माहे जुन महिन्यांचे निर्देशांक जाहीर झाल्याच्या नंतर डी.ए मध्ये वाढ बाबत अधिकृत्त निर्णय घेण्यात येईल . ऑल इंडिया ग्राहक निर्देशांची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | महिना | AICPI INDEX |
01. | जानेवारी 2024 | 138.9 |
02. | फेब्रुवारी 2024 | 139.2 |
03. | मार्च 2024 | 138.9 |
04. | एप्रिल 2024 | 139.4 |
05. | मे 2024 | 139.9 |
यांमध्ये माहे जुन महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्याच्या नंतर महागाई भत्ता वाढीबाबत , निर्णय घेण्यात येईल , तर सदर आकडेवारीचा विचार केला असता , डी. ए मध्ये 3 टक्के पर्यंत वाढ होईल , असा अंदाज आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए हा 53 टक्के पर्यंत वाढण्याची शक्यता आहे .
HRA मध्ये होणार वाढ : महागाई भत्ता हा 50 टक्केचा आकडा पार करेल , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीबरोबरच HRA मध्ये देखिल वाढ होणार आहे . सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या वास्तवानुसार 9 टक्के , 18 टक्के , 27 टक्के एचआरए मिळतो , तर सदर डी.ए वाढीनंतर घरभाडे भत्ता मध्ये 10 टक्के , 20 टक्के , 30 टक्के अशी वाढ लागु होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.