लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : एस टी महामंडळ अंतर्गत निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांकरिता आजन्म मोफत पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे , कारण या मागणीवर चांगलाच जोर धरून कर्मचारी राहिले होते . सोबतच आता सध्या जे कर्मचारी कार्यरत आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना मुदत दोन महिन्यांऐवजी सहा महिने निश्चित करावी लागेल. अशी महत्वपूर्ण माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघाचे अध्यक्ष यांनी दिली आहे.
तत्कालीन परिवहन मंत्री यांनी 2018 मध्ये एसटी महामंडळामधील निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता निवृत्तीनंतर पहिले सहा महिने मोफत प्रवास देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या माध्यमातून निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले व दुसऱ्या बाजूला ही सुविधा मर्यादित कालावधी करिता असल्यामुळे सध्या जे कार्यरत आहेत अशा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एसटी महामंडळामध्ये जवळपास 86 हजार कर्मचारी कार्यरत असून एसटीच्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक कामगाराचे योगदान हे मोलाचे आहे. नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोरोनासारखे वैश्विक संकट असो कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका ही नियमितपणे बजावली आहे.
मागील काही वर्षांपूर्वी महामंडळातील निवृत्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत धार्मिक पर्यटन करता यावे याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. या मागणीवर आता लक्ष केंद्रित करत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास दिला जाईल असा महत्वपूर्ण निर्णय एसटी महामंडळाने घेतला.
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक बाबी संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण माहिती पुस्तिका , PDF
यामुळे आता मोफत प्रवासाची मोठी संधी या कर्मचाऱ्यांपुढे उपलब्ध आहे. तर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन महिने मोफत एसटीचा प्रवास देण्यात येईल. परंतु आपले संपूर्ण आयुष्य प्रवाशांची वाहतूक करत असताना निवृत्तीनंतर किंवा पुढे कार्यरत असताना कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांसोबत फिरण्याकरिता मोफत पासचा मर्यादित कालावधी का असेल असा प्रश्न सर्व कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
याविषयी माहिती देत असताना संघटनेच्या माध्यमातून महामंडळाकडे एका मागोमाग एक पत्र व्यवहार केले जात आहेत. एसटीचा 75 वर्षाचा प्रवास आज बघितला तर कर्मचाऱ्यांमुळेच शक्य होत आहे. विविध कारणांकरिता आर्थिक संकटांमध्ये असूनही अशी सुविधा त्यांना का उपलब्ध होत नाही. निवृत्त झाल्यानंतर सहा महिन्यात आजन्म मोफत प्रवास मिळावा अशी मागणी महामंडळाकडे त्यांनी सादर केले आहे.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !