Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mukhyamantri yuva kary prashikshan yojana ] : सध्या राज्यांमध्ये लाडक्या बहीणींसाठी दरमहा 1500/- रुपये मिळणार आहेत , त्याकरीता राज्यांतील बहिणी अर्ज करण्यासाठी मोठी धावपळ करीत आहेत . अशातच आता राज्यातील सुशिक्षित लाडक्या भावांसाठी दरमहा 6 ते 12 हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ,याबाबत राज्य शासनांच्या कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत दिनांक 09 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामांचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षांपासुन सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
इयत्ता 12 वी , ITI , पदविका , पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करु शकणार आहेत . यानुसार राज्यातील लघु तसचे मध्यम व मोठे उद्योग , सहकारी संस्था , स्टार्टअप्स , शासकीय , निमशासकीय महामंडळ / आस्थापने , सामाजिक संस्था , कंपन्या , अशा विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील , यानुसार किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र ठरणार आहेत .
सदर योजना अंतर्ग सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतानुसार विद्यावेतन दरमहा पुढीलप्रमाणे अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यांमध्ये 12 वी पास असणाऱ्यांसाठी 6,000/- रुपये , आयटीआय / पदविका उत्तीर्ण उमेदवारांना 8,000/- रुपये तर पदवीधर / पदव्युत्तर उमेदवारांसाठी 10,000/- रुपये विद्यावेतन अदा करण्याचे निर्देश आहेत .
अ.क्र | शैक्षणिक पात्रता | दरमहा विद्यावेतन |
01. | पदवीधर / पदव्युत्तर पदवी | 10,000/- |
02. | आय.टी.आय / पदविका | 8,000/- |
03. | 12 वी पास | 6,000/- |
या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता : –
- उमेदवाराचे किमान वय हे 18 – 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
- उमेदवाराचे किमान शिक्षण हे 12 वी पास / आयटीआय / पदविका / पदवी तसेच पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर शिक्षण सुरु असणाऱ्यांना यांमध्ये सहभागी होता येणार नाहीत .
- उमेदवार हे राज्याचे रहीवाशी असणे आवश्यक असेल .
- उमेदवारांचे बँक खाते हे आधार कार्डाशी संलग्न असणे आवश्यक असेल .
- उमेदवारांनी कौशल्य , रोजगार व उद्योजकता आयुक्तलयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेले असावी .
या योजना संदर्भात अधिक माहितीसाठी राज्य शासनांकडून दिनांक 09 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..