7 वा वेतन आयोगाचा 5 वा हप्ता माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत अदा करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.11.07.2024

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 7 th pay commission 5th installment ] : राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा नियमित पाचवा हप्ता माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत अदा करणेबाबत राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) मार्फत दिनांक 11 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिनांक 01 जुलै 2023 रोजी दये असलेल्या 7 वा वेतन आयोग थकबाकीच्या 5 व्या हप्त्याचे प्रदान करणे बाबत वित्त विभागांकडून दिनांक 20.06.2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार जिल्हा परिषद , शासन अनुदानित शाळा ,सर्व शासन अनुदानित संस्था मधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम …

माहे जुन 2024 च्या वेतन / निवृत्ती वेतनासोबत अदा करावे असे नमुद करण्यात आलेले आहेत . तथापि थकबाकीच्या रक्कमेच्या प्रदाना संबंधी वित्त विभागाच्या दिनांक 20.06.2024 रोजीच्या निर्णयातील वाचा क्र.01 ते .05 येथील शासन आदेशातील अन्य तरतुदीचे पालन करण्याबाबतही निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच सदर निर्णयातील संदर्भ क्र.02 , 03 ,04 नुसार ही तरतुद योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदा व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांना लागु असणार आहेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच माध्यमिक शिक्षण संचालनाच्या स्तरावरुन मान्यताप्राप्त 100 टक्के खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यिमक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन 2024-25 मध्ये सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यासाठी पर्याप्त अनुदान मंजुर करण्यात आले आहेत . सद्यस्थितीमध्ये मंजूर अनुदानाच्या 42 टक्के अनुदान माहे जुलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 01.04.2024 नुसार वितरीत करण्यात आले असून , प्राप्त अनुदानातुन माहे जुलै अखेरपर्यंतचे नियमित वेतन अदा करणे क्रमप्राप्त असल्याने , नियमित वेतन अदा करणेबाबत सुचना देण्यात आलेले आहेत .

वेतन घेणाऱ्या कर्मचारी यांचे माहे जुलै 2024 चे वेतन सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व काही कारणस्तव राहीलेला 1,2,3,4 हप्ता अदा करणे शक्य असल्याने , वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचे माहे जुलै 2024 चे वेतन सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करुन दिलेल्या अनुदानातुन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment