महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी संदर्भात महत्त्वपूर्ण असणारे शासन निर्णय परिपत्रके, आदेश, नियम, विनियम यांच्या आधारे प्रश्न-उत्तर स्वरूपात महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवाविषयक बाबी संदर्भात PDF स्वरूपात माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे . सदर माहिती पुस्तिका तयार करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव ( सेवा ) डॉ.भगवान सहाय यांचे मोलाचे योगदान आहे .
सदर सेवाविषयक माहिती पुस्तिका मध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या आस्थापनाविषयक , महाराष्ट्र समाजातील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या उद्भवणारी प्रशासकीय चौकशी तसेच न्यायालयीन प्रकरणे त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक ( शिस्त व अपील ) नियमांतर्गत येणाऱ्या सर्व बाबी विभागीय चौकशी यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे .
त्याचबरोबर सेवा भरती नियम ,सेवा भरती पद्धती ,स्थायीकरण पद्धती ,नियम ,निवड सूचीचे तत्वे आणि सेवाजेष्ठतेचे नियम तसेच बदल्या याबाबतचे धोरण आणि त्याबाबत मंत्रालय विभागांनी सल्ला देणे या संदर्भातील सविस्तर माहिती नमूद करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर राज्याचे प्रशिक्षण धोरण सदर सेवाविषयक बाबी मध्ये नमूद करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणार मोफत प्रवासाचा लाभ !
तसेच स्थापना मंडळ ,गोपनीय अहवाल तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सेवेत वाढ पुनर्नियुक्ती, करार पद्धतीने नियुक्ती , वाणिज्य नोकरी स्वीकारण्यासाठी अनुमती, कंत्राटी पद्धतीने नियुक्ती यासंदर्भातील सविस्तर माहिती विशद करण्यात आली आहे .
त्याचबरोबर मंत्रालय विभागातील कर्मचाऱ्यांसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील कक्ष अधिकाऱ्यांसाठी विभागीय परीक्षा सेवा सेवा प्रवेशोत्तर पदोन्नती आयोजित करणे ,विभागीय परीक्षेसंबंधीचे सर्वसाधारण धोरण व विभागांना मार्गदर्शन त्याचबरोबर एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम या संदर्भातील सविस्तर माहिती सदर माहिती पुस्तिकांमध्ये विशद करण्यात आलेली आहे .
या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून डॉ.भगवान सहाय लिखित सेवाविषयक माहिती पुस्तिका PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !