Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state gramin jivanjyoti women employee ] : राज्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महिला व कर्मचारी कल्याण कारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांसाठी शासन दरबारी आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहेत .

उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संघटना मार्फत विविध प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी मुंबईमधील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . याकरीता राज्याच्या विविध जिल्ह्यातुन दि.09 जुलै रोजी उमेद महिला व कर्मचारी मुंबई कडे रवाना झालेले आहेत .

राज्यांमध्ये उमेद ग्रामीण जीवन्नोती अभियान ही सन 2013 पासुन सुरु झाले आहे , तर गरीब व वंचित महिलांच्या स्वयंसहायता निर्माण करुन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम कामकाज या अभियाना मार्फत करण्यात येते . या अभियान अंतर्गत राज्यांमध्ये हजारो महिलांचे स्वत : लघु / मोठे उद्योग सुरु झालेले आहेत . या अभियानाकरीता राज्य शासनांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आलेली होती .

सन 2013 पासुन हे अभियान सुरु झालेले असून , सदर कर्मचारी अद्याप पर्यंत कंत्राट पद्धतीनेच काम करीत आहेत , सदर कर्मचाऱ्यांचे देखिल कुटुंब असून , त्यांनी इतरांना आत्मसन्माने जगाण्यास शिकविले तर त्यांना आत्मसन्माने जगण्यासाठी त्यांच्या प्रलंबित मागण्या राज्य शासनांकडून मान्य केले पाहीजेत असे संघटना पदाधिकाऱ्यांकडून नमुद करण्यात आलेले आहेत .

प्रमुख मागण्या : सदर अभियानास पंचायत राज्य विभाग मधील राज्य शासनांचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापना स्थापना करुन मान्यता देण्यात यावी , सदर अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी / कर्मचारी , समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनांच्या समकक्ष असणाऱ्या पदांवर कायमस्वरुपी पद्धतीने समाविष्ट करुन घ्यावेत . कृषी व्यवस्थापक , पशु व्यवस्थापक  , मत्स्य व्यवस्थापक , प्रभाग संघ व्यवस्थापक यांना इतर उमेद अभियानातील केडर प्रमाणे मानधन करण्याची मागणी करण्यात आली आहे .

गाव पातळीवर उपजिविका गाव फेरी आयोजनातुन उपजिविका क्षमता बांधणी तसेच बरोजगार वर्धनिना रोजगार संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे . अशा विविध मागण्यांसाठी आज दिनांक 10 जुलै 2024 पासुन आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *