Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension scheme employee hallabol strike news ] : जुन्या पेन्शनच्या समिती शिफारशीच्या सुधारित पेन्शन योजना ऐवजी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना भविष्य निर्वाह निधी योजना (GPF ) सह पूर्ववत लागू करण्याकरिता दिनांक 14 जुलै 2024 वार रविवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती समोर..

“हल्लाबोल आंदोलन” करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्यामार्फत मा.खाजगी सचिव माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या यांच्या प्रति दिनांक 08 जुलै 2024 रोजी निवेदन पत्र सादर करण्यात आले आहेत .

श्री. गौरव काळे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती यांच्या दिनांक 08 जुलै 2024 रोजी मिळालेल्या निवेदन पत्रानुसार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती कार्यालयास निवेदन सादर केले आहे . सदर निवेदनामध्ये जुन्या पेन्शनच्या समितीच्या शिफारशीच्या सुधारित पेन्शन योजना ऐवजी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना भविष्य निर्वाह निधी योजना सह पूर्ववत लागू करण्याकरिता…

दिनांक 14 जुलै 2024 वार रविवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती समोर “हल्लाबोल आंदोलन” करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे . तरी सदर निवेदन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्यामार्फत माननीय खाजगी सचिव ,  माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या प्रति सदर निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे , सदर निवेदन पत्र पुढील प्रमाणे पाहू शकता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *