Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra wather forecast update news ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचे संकेत आहेत , यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तर प्रशासनांकडून शाळा , कार्यालयांना सुट्टी दिली जात आहे .

कालपासुन राज्यांमध्ये कोकण भागांसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने चागलीच धुमाकुळ घातली आहे , तर काम असेल तर घरातुन बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे . तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत , भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यात अतिवृष्टी होणार असल्याचे संकेत वर्तविण्यात आलेले आहेत .

राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी : राज्यातील सातारा , रत्नागिरी , पुणे , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे , यामुळे या जिल्ह्यात अतिवृष्टी दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच या जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आलेले आहेत , तर प्रशासनांकडून बचाव कार्यासाठी सज्ज झालेले आहेत .

या शिवाय मुंबई , ठाणे , पालघर , रायगड , अमरावती या जिल्ह्यांमध्ये देखिल कालपासुन अतिवृष्टी कायम असणार असून पुढील 24 तास या ठिकाणी पाऊस सक्रिय असणार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत . यामुळे मुंबई / ठाणे जिल्हा प्रशासनांकडून आज दि.09 जुलै रोजी शाळांना सुट्टी देण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत .

याशिवाय कोकण विभागातील लागुन असणाऱ्या जिल्ह्यांत व विदर्भातील अकोला , अमरावती तसेच यवतमाळ या जिल्ह्यांकरीता पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .या जिल्ह्यांमध्ये ढगांचा गर्जनांसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आला आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *