Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state farmer loan free scheme news ] : राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज तेलंगणा राज्य शासनांच्या धर्तीवर माफ केले जावे अशा प्रकारची मागणी राज्यांमध्ये सर्वत्र होत आहे . तर राज्य शासनांची सर्व बाजुने विरोधी पक्षांनी कोंडी करण्यात आली आहे . तर मागील रब्बी हंगामामध्ये राज्यातील मराठवाडा , विदर्भ विभागांमध्ये पावसाच्या अभावी कोणतेही पिक येवू शकले नाहीत .
कमी उत्पादन , त्यात शेतीपिकाला बाजारभाव नाही , अशा कारणांमुळे शेतकऱ्यांची सर्व बाजुनी हताश परिस्थिती निर्माण झालेली असल्याने , शेतकरी जगण्यांसाठी धडपड करीत आहे , म्हणूनच आपला सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमाफीची वाट आतुरतेने पाहत असल्याचे दिसून येत आहेत . नुकतेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या , यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यांमध्ये देशभरांमध्ये शेतकरी कर्जमाफी लागु करण्याचे नमुद करण्यात आले होते .
तर शेतकऱ्यांचे फक्त एक वेळी कर्ज माफी करुन चालणार नाही , तर याकरीता संस्थात्मक व्यवस्था उभारण्याचे आश्वासन राहुल गांधी यांच्याकडून देण्यात आले होते . तेलंगणाा राज्यांमध्ये , काँग्रेस पक्षाने सत्ता स्थापन केली होती , यांमध्ये काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना कर्ज माफीचे आश्वासन देण्यात आले होते , तर सत्ता आल्याच्या नंतर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कर्जमाफीची घोषणा केली .
सदर कर्जमाफीचा फायदा तेलंगणा राज्यातील तब्बल 40 लाख शेतकऱ्यांना होणार आहे , तर तिजोरीवर तब्बल 31 हजार केाटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . सदर कर्जमाफीमुळे राज्यांमध्ये देखिल कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे , शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमााणात कर्जमाफीची मागणी करण्यात येत आहे .
राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी नुकतेच राज्याचे अर्थसंकल्प मांडले यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणत्याही प्रकारची तरतुद करण्यात आलेली नाही , तर कर्जमाफी बद्दल स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले होते कि ,महसुल वाढीनंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी निश्चितच वाट पहावी लागणार आहे .
कर्जमाफी न केल्यास विद्यमान सरकारला निवडणुकीत फटका : विद्यमान राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न केल्यास , निश्चितच महायुती सरकारला आगामी विधानसभा निवडणुकींमध्ये फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !