Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee new pay scale & other 25 allowance increase nirnay ] : राज्य शासनांकडून राज्यातील अधिकारी – कर्मचाऱ्याच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे , विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर , मुळ वेतनांमध्ये 19 टक्के वाढ तर इतर सर्व भत्यांमध्ये 25 टक्के वाढीचा राज्य शसनांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या. , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या . या तीन्ही वीज कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये चक्क 19 टक्क्यांची वाढ तर इतर सर्व भत्यांमध्ये 25 टक्के पर्यंतवाढ करण्यात आली आहे .

काल दिनांक 07 जुलै रोजी सह्याद्री अतिथी गृह येथे राज्य शासनांच्या उर्जा विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या तीन्ही कंपन्यांच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आलेल्या होत्या , यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते . सदरच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर वेतन / इतर भत्ते वाढीचा निर्णय घेतला .

मुळ वेतन / इतर भत्ते तसेच परिविक्षाधीन कालावधी मानधन : सदर तीन्ही कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये 19 टक्के तर सर्व प्रकारच्या भत्यांमध्ये 25 टक्के पर्यंत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे , तसेच सहाय्यक या पदांवर नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांच्या करीता परिविक्षाधीन कालावधी साठी 5000/- रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे , तर तांत्रिक कर्मचारी यांना देय होणारा 500/- रुपयांचा भत्ता मध्ये वाढ करुन 1000/- रुपये इतका करण्यात आला आहे .

या नियर्णयामुळे राज्यातील वरील नमुद तिन्ही कंपन्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना वेतन वाढ / इतर सर्व भत्यातील वाढीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *