Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee demand in pavadali adhiveshan ] : दिनांक 11 जुलै पर्यंत राज्याचे पावसाळी अधिवेशन असणार आहेत , सदर अधिवेशनांमध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले असून विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे . तर राज्यातील कोणत्या मागणींवर आतापर्यंत चर्चा अधिवेशनात झाली व कोणत्या मागणींवर निर्णय होण्याची शक्यता आहे , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

जुनी पेन्शन योजना ( Old Pension )  : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या मुद्द्यावर अधिवेशनांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली असून , याबाबत राज्याचे मुख्यमंत्री / वित्त मंत्री प्रतिउत्तर देताना सांगितले आहे , कि पुढील महिन्यांच्या आतमध्ये सदर पेन्शन मागणीवर निर्णय घेण्यात येईल , अशी ग्वाही देण्यात आलेली आहे .

विरोधक तसेच शिक्षक आमदारांकडुन अधिवेशनांमध्ये पेन्शनच्या मागणींवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते , यावर वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे कि , राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना तसचे ज्यांना आत्तापर्यंत प्रान कार्ड दिले गेले नाहीत अशा सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एनपीएस खाते उघडण्याकरीता संबंधित विभागांना निर्देश देण्यात आलेले आहेत .

महागाई भत्ता वाढीवर वित्त विभागाचा प्रस्ताव : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 50 टक्के डी.ए वाढ करणेबाबत प्रस्ताव वित्त विभागांकडून तयार करण्यात आला आहे . तर सदर प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रीमंडळाची मंजूर बाकी आहे , मंजूरी झाल्याच्या नंतर पुढील महिन्याच्या वेतन / निवृत्तीवेतन देयकासोबत वाढीव डी.ए लागु करण्यात येईल .

सेवानिवृत्तीच्या वय वाढीवर सरकार नकारात्मक : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत राज्य सरकारकडून कोणतीही प्रशासकीय हालचाली सुरु करण्यात आली नसल्याची माहीती समोर येत आहे , यामुळे कर्मचाऱ्यांच्या सदर मागणींवर राज्य सरकार नकारात्मक असल्याचे दिसून येत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *