Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ newly appointed teacher imp paripatrak ] : पवित्र प्रणाली अंतर्गत नव्याने रुजु झालेल्या शिक्षकांना शिक्षण सेवक ऐवजी शिक्षक पदी रुजु करुन घेणेबाबत , शिक्षण आयुक्तालयाचे महत्वपुर्ण परिपत्रक दिनांक14 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेले होते . सदरचे सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरती अंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी कांही उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासन अनुदानित पदांवर शिक्षक पदी कार्यरत होते , त्यामुळे त्यांचे यापुर्वीच शालार्थ प्रणालींमध्ये शालार्थ आयडी उपलब्ध आहे .
अशा शिक्षक कर्मचारी यांना शिक्षण आयुक्लालयाच्या दिनांक 22.09.2022 व दिनांक 15.09.2011 रोजीच्या शासन निर्णयातील अटींचे पुर्तता होत असल्यास , त्यांना पुन्हा शिक्षण सेवक योजना लागू न करता रुजू झालेल्या पदांच्या वेतनश्रेणीतील मूळ वेतन ( आरंभीचे वेतन ) देण्यात यावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच कोणत्याही परिस्थतीत सद्यस्थितीत त्यांच्या चालु असलेल्या वेतनास संरक्षण देण्यात येवू नयेत , याबाबतचे आदेश प्राथमिक , माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांच्याबाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या परिपत्रकाच्या अनुषंगाने नुकतेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातुन शिक्षण सेवक पदी नियुक्त झालेल्यांना थेट शिक्षक पदी रुजु करुन घेण्याचे निर्देश आहेत . या संदर्भातील शिक्षण आयुक्तालयांमार्फत निर्गमित सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.