लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेतील खालील नमुद विभागातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रजेच्या मंजुरीचे अधिकार संदर्भात राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दि.07 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . रजा मंजुरी संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात ..
आरोग्य सेवा तथा अभियान संचालक , राष्ट्रीय आरोग्य अभियान , मुंबई यांना आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत . आता सदर शासन आदेशानुसार आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क व ड च्या कर्मचाऱ्यांना विहीत नियमांनुसार संबंधित कर्मचारी अध्ययन रजेसाठी पात्र असल्यास अध्ययन रजा मंजूरीचे अधिकार विभाग प्रमुख म्हणून आयुक्त , आरोग्य सेवा आयुक्तालय , मुंबई यांना प्रदान करण्यात येत आहेत .
अध्ययन रजा मंजुर करताना संबंधित कर्मचाऱ्यांचे यापूर्वी सेवांतर्गत प्रशिक्षण हे प्रतिनियुक्ती संबांधून दिले असले तरी असा प्रतिनियुक्ती दर्शविलेल्या प्रशिक्षण कालावधी हा अध्ययन रजा म्हणून परिगणीत करण्यात यावा व अशा प्रकरणात मर्यादेतच उर्वरित अध्ययन रजा अनुज्ञेय असल्यास , मंजूर करण्यात यावेत असा आदेश देण्यात आला आहे .
हे पण वाचा : पेन्शनधारकांचा पुण्यात महामेळावा !
त्याचबरोबर या शासन आदेशाच्या दिनांकानंतर कोणतेही नविन अध्ययन रजा मंजूरीचे प्रस्ताव उपरोक्तनुसार आयुक्त सेवा आयुक्तालय , मुंबई यांचे स्तरावरुन निकाली काढण्यात यावेत असे आदेश देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील महाराष्ट्र राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दि.07 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !