Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pradhanmantri jan Arogya yojana ] : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत रुपये 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार राज्यातील शासकीय तसेच राज्य शासनांचे जाहीर केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहेत . सदरची योजनांच्या माध्यमातुन राज्यातील सर्वच रेशन कार्डधारकांना लाभ होणार आहे .
सदर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सुरुवात दिनांक 01 जुलै 2024 पासुन करण्यात येत आहेत . मागील वर्षात राज्यात आयुष्याम भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नविन अंमलबजावणीप्रमाणे सुरु करण्याचा आदेश पारित केला होता , सदर आदेशाची अंमलबजावणी ही दिनांक 01 जुलै 2024 पासुन करण्यात आलेली आहे .
रुग्णालयांने उपचार न केल्यास रुग्णालयांवर होणार कारवाई : जर सदर योजना अंतर्गत रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ / दिरंगाई केल्यास अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सक्त सुचना महाराष्ट्र शासनांकडून देण्यात आलेल्या आहेत . राज्य शासनांकडून ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये सदर योजना लागु करण्यात आलेली आहे , अशा रुग्णालयांची यादी आपणांस आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयातुन मिळेल .
सदर योजना लाभ नेमका कोण-कोणाला मिळणार ? : या योजनांच्या माध्यमातुन राज्यातील सर्वच प्रकारच्या रेशन कार्ड व आयुष्यमान भारत कार्डधारकांना होणार आहे , तसेच रेशन कार्ड नसल्यास त्यांना तहसीलदार यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल , तर शासन मान्य संस्थामधील अनाथ मुले , वृद्धश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांचे कुटुंबीय …
तसेच राज्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असणारे कामगार , महाराष्ट्र -कर्नाटक सीमा लगल असणारे 865 गावांतील कुटुंबे तसेच रस्ता अपघातग्रस्तासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये लाभ घेणार आहे त्या जिल्ह्यातील एम एल सी , ओळखपत्र धारकांना सदर यांजनांच्या माध्यमातुन 5 लाख रुपये पर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत .