Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update from 01 july to 04 july 2024 ] : राज्यांमध्ये कालपासुन पावसाची तिव्रता अधिकच वाढली आहे , यामुळे राज्यातील काही भागांमध्ये भयंकर अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून देण्यात आलेली आहे . राज्यातील सर्वत्र भागांमध्ये पुढील 04 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
काल दिनांक 30 जुन रोजी राज्यात विदर्भ व मराठवाडा विभागात मोठा मुसळधार पाऊस झाला आहे , तर लातुर , परभणी , बीड , धाराशिव , नांदेड , यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोराच्या वाऱ्यांसह मोठा पाऊस पडला आहे . यामुळे राज्यात आता सर्वत्र ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे , तर राज्यांमध्ये काही ठिकाणी पुढील 04 दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
01 ते 04 जुलै पर्यंत या भागात अतिवृष्टीची शक्यता : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रांमध्ये भयंकर मोठा पाऊस पडणर असल्याचा अतिवृष्टी होण्याची संभावना हवामान तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहेत .
विदर्भ व मराठवाडातील हवामान अंदाज : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , विदर्भ व मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये दिनांक 03 जुलै पासुन मोठ्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे . काल दिनांक 30 जुलै पर्यंत या विभागांमध्ये चांगला पाऊस पडल्याने पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहेत .
भारतीय हवामान विभागांने दिलेल्या अंदाजानुसार आजपासुन 04 जुलै पर्यंत कोकण किनारपट्टीवर सर्वच जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , त्याचबरोबर लातुर , धाराशिव , अकोला , यवतमाळ , नागपुर , वर्धा या जिल्ह्यांमध्ये आजपासुन जोराच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
तर दिनांक 03 जुलै ते 04 जुलै या दोन दिवसांमध्ये विदर्भ / मराठवाडा विभागांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार असल्याचा अंदाज हवामान विभागांकडून वर्तविण्यात आली आहे .यामुळे दिनांक 04 जुलै पर्यंत राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !