Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee sudharit NPS Not Accepted & Again demand ops ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहेत , याबाबत सध्याच्या सुरु असलेल्या अधिवेशनांमध्ये घोषणा करण्यात केली जाण्याची शक्यता आहे , परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेला देखिल कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शविण्यात येत आहेत .

तर राज्यातील कर्मचाऱ्यांकडून पुन्हा जुनी पेन्शन योजनाची मागणी करण्यात येत आहेत . सुधारित पेन्शन योजनांमध्ये देखिल जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागु होणार नसल्याची भिती कर्मचाऱ्यांमध्ये आहे , कारण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये फक्त जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा करता यावी , याची तरतुद केली आहे . तर सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे सर्व लाभ जशाच्या तसे लागु करण्यात आलेले नाही , यामुळे कर्मचाऱ्यांकडून सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा विरोध केला जात आहे .

सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के , 40 टक्के व 35 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल . त्याचबरोबर जुन पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागु आहे , सदर योजना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये लागु नाही . त्याचबरोबर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये पेन्शन वृद्धीची तरतुद नसणार आहे .

राष्ट्रीय पेन्शन योजनांतील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम : सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे NPS मधील योगदान कायम असणार आहेत , तर सदरचे योगदान कर्मचाऱ्यांना परत मिळणार नाहीत , यामुळे सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये देखिल कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे फायदा मिळणार नसल्याने , कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनची मागणी केली जात आहे .

अर्जित रजा / सेवानिवृत्ती उपदान : सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये अर्जित रजा रोखीकरणचा लाभ तसेच सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे या बाबींमध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे .

जुनी पेन्शन न दिल्यास Vote For OPS चा नारा : राज्यातील कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन योजना लागु न केल्यास , येत्या विधानसभा निवडणुकींमध्ये कर्मचाऱ्यांकडून जो पक्ष जुनी पेन्शन देईल , त्यालाच मतदान करेल याकरीता  Vote For OPS असा नारा देण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *