Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cm mazi ladaki bahin yojana ] : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील वय वर्षे 21 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500/- रुपये मिळणार आहे , याकरीता पात्रताधारक महिलांना दि.01 जुलै 2024 पासुन ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .

या योजनचे मुख्य उद्देश : या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी तसेच सुविधा उपलब्ध करुन रोजगार निमिर्तीकरीता करीता चालना मिळणून देणे , त्याचबरोबर महिलांना आर्थिक , सामाजिक पुनर्वसन करणे , तसेच राज्यतील महिलांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करणे , तसेच सशक्तीकरणास चालन देणे , महिलांवर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीमध्ये सुधारण करणे हे प्रमुख उद्देश आहेत .

या योजनेचे स्वरुप : या योजनेचे स्वरुप पाहिले असता , पात्र महिलेला त्याच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने दर महिन्याला 1500/- रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे , तसेच महिला यापुर्वीपासून केंद्राच्या तसेच राज्य शासनांच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनाद्वारे 1500/- पेक्षा कमी आर्थिक लाभ घेत असल्यास तर फरकाची रक्कम पात्र महिलांना देण्यात येणार आहे .

योजनांच्या लाभार्थ्यांची पात्रता : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्याकरीता लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत , तसेच राज्यातील विवाहीत , परित्यक्त्या , विधवा , निराधारीत महिला या योजना अंतर्गत लाभ घेवू शकतील . तसेच लाभार्थी महिलांचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज , लाभार्थ्यांचे आधार कार्ड , रहिवाशी ( अधिवास ) प्रमाणपत्र / राज्यातील जन्म दाखला , कुटुंब प्रमुखाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असावेत ) , पासपोर्ट आकाराचा फोटो , बँक खाते , रेशकार्ड , योजनांच्या अटी व शर्तींचे पालन करणेबाबत हमीपत्र . हे कागदपत्रे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : सदर योजनांच्या माध्यमातुन दिनांक 01 जुलै 2024 ते  दि.15 जुलै 2024 पर्यंत योजनेच्या अर्ज पोर्टल / मोबाईल ॲपद्वारे / सेतु सुविधा केंद्राद्वारे पात्र महीलांनी अर्ज सादर करायचे आहेत , तर ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाहीत , अशांना अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये ग्रामपंचायत / वार्ड / सेतु सुविधा केंद्र येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

या संदर्भातील महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 28 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *