Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ period basis / daily wages employee pay increase nirnay ] : महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील तसेच वसतिगृहातील कार्यरत तासिक तसेच रोजंदारी धुलाई कर्मचाऱ्यांचे तासिक व मानधन वाढीबाबत , आदिवासी विकास विभागांकडून महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिक तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना प्रतिदिन 5 तास या प्रमाणे पुढे नमुद करण्यात आल्यानुसार सुधारित मानधन हे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासुन देणेबाबत शासन मान्यता देण्यात येत आहेत .

मासिक कामकाजाचे 21 दिवस याप्रमाणे 5 तास करीता सुधारित मानधन प्रति घड्याळी तास प्रमाणे सुधारित मानधन दर पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रपदनामअर्हतासुधारित मानधन (प्रति तास )
01.उच्च माध्यमिक शिक्षकपुर्ण अर्हता200/-
02.उच्च माध्यमिक शिक्षकअपुर्ण अर्हता190/-
03.माध्यमिक स्तर शिक्षकपुर्ण अर्हता190/-
04.माध्यमिक स्तर शिक्षकअपुर्ण अर्हता170/-
05.प्राथमिक शिक्षकप्रशिक्षित170/-
06.प्राथमिक शिक्षकअप्रशिक्षित160/-

तसेच आदिवाी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील स्त्री अधिक्षिका व पुरुष अधिक्षक यांना प्रतिमाह रुपये 20,000/- रुपये इतके सुधारित मानधन शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासुन देणेबाबत शासन मान्यता देण्यात येत आहेत .

तर सदर विभागातील वर्ग ड कर्मचारी यांमध्ये स्वयंपाकी / कामठी / शिपाई / चौकीदार व सफाईगार तसेच वर्ग ड कर्मचारी ( धुलाई काम करणारे कर्मचारी ) कर्मचाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागांकडून त्या त्या आर्थिक वर्षात संबंधित जिल्ह्याच्या दर सुचित मंजूर करण्यात येणाऱ्या अकुशल मजुराचे दैनिक मजुरी दरानुसार सुधारित मानधन मंजूर करण्यात येत आहेत .

या संदर्भात आदिवासी विकास विभागांकडून निर्गमित सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *