Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cotton & soyabean farmer aid shasan nirnay ] : राज्यातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पांमध्ये मोठी भेट मिळाली आहे , सदर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000/- रुपये मदत निधी जाहीर करण्यात आलेली आहे .
दिनांक 28 जुन 2024 रोजी राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला , यांमध्ये त्यांनी राज्यातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदत निधीची तरतुदीची घोषणा करण्यात आली . यांमध्ये नमुद करण्यात आले कि , हवामानांच्या बदलांमध्ये वरील नमुद दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून , सदर शेतकऱ्यांना मदतीची आवश्यक असल्याचे , नमुद करण्यात आले .
तसेच हवामान बदलांमुळे राज्यातील कापुस व सोयाबीन उत्पादकांच्या उत्पादन क्षमतांमध्ये देखिल विपरित परिणाम झालेले दिसून आहे . सन 2023-24 या वर्षांमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना उचित भाव मिळालेला नाही , यामुळेच सदर शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा , याकरीता 5,000/- रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे .
याकरीता अर्थसंकल्पांमध्ये तब्बल 4 हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे . सदरची मदत निधी ही सन 2023-24 या वर्षातील उत्पादक पिकाकरीता असल्याने , ज्यांची सदर पिकांची नोंद असेल , अशा सर्व शेतकऱ्यांना मदत निधी मिळणार आहे .
या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना काही अंशी मदत झाली असली तरी , सदर उत्पादक शेतकऱ्यांकडून भाव वाढीची प्रतिक्षा अद्याप सुरु आहे . सदर पिकांच्या भाव वाढी केल्यास , मदत निधीची देखिल आवश्यक असणार नाही , असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !