Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee nirnay in pavasali adhiveshan ] : राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक 27 जुलै पासुन सुरु झालेले असून , राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबींवर अधिवेशनांमध्ये महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . याबाबतचे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

राज्याच्या पावसाळी अधिवेशनांमध्ये , विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहेत . यांमध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते  अदा करणेबाबत श्री.किरण सरनाईक , श्री.विक्रम काळे तसेच श्री.सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केले केले असता , सदर बाबींवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांस निर्देश देण्यात आलेले आहेत .

यांमध्ये राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 2 हप्ते प्रदान करण्यात आलेले आहेत , यामुळे उर्वरित हप्ते हे तात्काळ अदा करणेबाबतची कार्यवाही करण्याची चर्चा अधिवेशनांमध्ये झाली आहे . यावर शिक्षक आमदारांनी लक्ष वेधले आहे .

श्री.कपिल पाटील : श्री.कपिल पाटील यांनी अधिवेशनांमध्ये राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची खाती ऑनलाईन करणेबाबत , प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर , याबाबत तात्काळ कार्यवाही महालेखापाल कार्यालयांकडून करण्यात आलेली आहे . तर सन 2023-24 या वर्षांसाठी भविष्य निर्वाह निधी लेखा स्लिप प्रदान केल्या आहेत , तर सदरच्या स्लिपा ह्या https://sevaarth.mahakosh.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत .

सदर संकेतस्थळावर सन 2023-24 या वर्षाच्या GPF  च्या स्लिप्स डाऊनलोडिंग / प्रिंटिंग साठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत . जर सदर स्लिप्समध्ये काही त्रुटी / चुका आढळून आल्यास आपल्या संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या मार्फत वरिष्ठ महालेखापाल मुंबई यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *