Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer process in next month ] : यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणुका तसेच त्यानंतर विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितांमुळे कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस ब्रेक लागला होता , तर आता पुन्हा पुढील महिन्यांपासुन कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस वेग येणार आहे .
दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या माहे मे महिन्यांमध्ये होतात , तर इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया माहे जुलै महिन्यापर्यंत पुर्ण होते , परंतु यंदाच्या वर्षी बदली प्रक्रियेस विलंब होत आहे , तर राज्यात आचारसंहिता उठल्याने , कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस पुन्हा एकदा वेग आलेला दिसून येत आहेत .
बदली प्रक्रियेसाठी राज्य शासनांकडून प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे . राज्यात जिल्हा परिषदांतील शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्या ह्या माहे जुन महिन्याच्या सुरुवातीलाच ( शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या अगोदरच ) केल्या जातात , परंतु यंदाच्या वर्षी जुन महिना संपत आला तरी देखिल बदली प्रक्रिया पुर्ण झालेली नाही . तर सध्या जिल्हा परिषदांमध्ये विनंती तसेच आपसी बदल्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनांकडून देण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या बाबत देखिल केवळ विनंती बदल्या ह्या तुर्तास मा.मुख्यमंत्री यांच्या सहीने बदली केली जाणार असल्याची माहिती मा.मुख्य सचिव यांनी कर्मचारी संघटनांच्या बैठकी दरम्यान सांगितले आहेत .
तर राज्यातील सर्वसाधारण बदल्या व प्रशासकीय बदल्याबाबतची प्रक्रिया ही माहे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपासून राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे . यामुळे बदलीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही आत्ताची महत्वपुर्ण अपडेट असणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.