Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ marathavada package sheli gat vatap scheme ] : मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात 20 शेळ्या + 02 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 27 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यांमध्ये 20 शेळ्या अधिक 02 बोकड असा शेळी गट वाटपाच्या पथदर्शी योजनांस कृषी व पदुम विभागांच्या दिनांक 15.10.2016 रोजीच्या निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे . तसेच दिनांक 15.10.2017 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार सदर योजना अंतर्गत सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के बँक एन्डेड अनुदान देय असून , गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या 6 महिन्यात 25 टक्के व उर्वरित 25 टक्के अनुदान ..
दुसऱ्या सहा महिन्यात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे . यानुसार जालना जिल्ह्यात एकुण 1 हजार लाभार्थ्यांना या योजना अंतर्गत लाभ देण्यात येणार आहेत . तर सन 2022-23 पर्यंत 449 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे . तर उर्वरित 551 लाथार्थ्यांना अद्यापही या योजना अंतर्गत लाभ द्यावयाचा आहे , तर सदरच्या योजना अंतर्गत सन 2025-26 या कालावधीत योजनेच्या मुळ 1000 गट वाटपाच्या लक्षांकाच्या मर्यादेत राबविण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती , त्या अनुषंगाने पुढीप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहेत .
मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात 20 शेळ्या + 02 बोकड असा शेळी गट 50 टक्के बॅक एन्डेड अनुदान तत्वावर वाटपाच्या पथदर्शी योजनांस सन 2024-25 व सन 2025-26 या वर्षासाठी योजनाच्या मुळ 1000 गट वाटपाच्या लक्षांकाच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहेत .
सदर मराठवाडा पॅकेज अंतर्गत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकरी / शेतमजुरांना 20 शेळ्या + 02 बोकड अशा शेळी गट वाटप योजना राबविण्यात येते .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !