Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update news ] : राज्यांमध्ये दिनांक 30 जुन पर्यंत तुफान पावसाचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या कडून वर्तविण्यात आला आहे . या काळांमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे , कारण पाऊस हा विजेच्या कडाक्यासह भयंकर जोराचा पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
राज्यात प्रलंकारी पावसाचा अंदाज : पुर्व विदर्भ , पश्चिम विदर्भ , जळगाव , छत्रपती संभाजीनगर , वर्धा , नागपुर , भंडारा , गोंदिया , अमरावती , अकोला , वाशिम , बुलढाणा , परभणी , जळगाव , जालना , बीड ,नगर , नाशिक , धुळे , नंदुरबार , कोकण पट्टीवरील जिल्ह्यात पुढील 2 दिवसांमध्ये जोराचा भयंकर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे , तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये यापैकी सातारा , सांगली , कोल्हापुर , सोलापुर कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे .
राज्यात पाऊस सुरुच असणार आहेत , एकदम पाऊस बंद होणार नाही , तर पाऊस भाग बदलुन चालुच राहणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे . राज्यात दिनांक 29 जुन रोजी सर्वत्र पाऊस होणार आहे . या काळांमध्ये राज्यातील मराठवाडा , विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार आहे .
28 तारखेला पाऊस हो राज्यात सगळीकडे पडणार नसुन वरील नमुद जिल्ह्यांमध्येच भयंकर ढगफुटीचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . तर पुढील महिन्यांमध्ये दिनांक 4 जुलै नंतर पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , तर पुढील महिन्यांमध्ये 11 जुलै ते 13 जुलै त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै दरम्यान जोराचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
या पावसांमुळे राज्यातील पेरणी झालेल्या पिकांस पोषक वातावरण तयार होणार आहे , तर पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात भयंकर जोराचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने , शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काळजी घेण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !