Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee July month increament ] : राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै वेतन बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहेत , राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात येत असते . यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहे .
राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै मध्ये वार्षिक वेतनवाढ लागु केली जाते यामुळे राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात वार्षिक वेतनवाढीमुळे पगारात मोठी वाढ मिळणार आहे . तर वार्षिक वेतनवाढ लागु करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये एखादा कर्मचारी मागील वर्षाच्या दिनांक 01 जुलै पासून ते चालु वर्षाच्या दिनांक 30 जुन पर्यंतच्या कालावधीत एकुण 6 महिने अथवा त्यापेक्षा कमी काळासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांस चालु वर्षाकरीताची दिनांक 01 जुलैची वार्षिक वेतनवाढ ही अनुज्ञेय असेल .
तसेच महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियमांनुसार , परिविक्षाधीन म्हणून एखाद्या पदावर थेट नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली वेतनवाढ ही त्याचा 01 वर्षे परिवेक्षेचा कालावधी पुर्ण झाल्याच्या नंतर देण्यात येईल , अशी तरतुद करण्यात आलेली आहे .
वार्षिक वेतनवाढ किती लागे होते ? : सहाव्या वेतन आयोगांमध्ये मुळ वेतनाच्या 3 टक्के रक्कम वार्षिक वेतन वाढ म्हणून दिली जात होते , त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगांमध्ये 3 टक्के वार्षिक वेतनवाढ दिली जाते . परंतु आपल्या मुळ वेतनाच्या 3 टक्के रक्कम ही पुढील शतक अंकांमध्ये रुपांतरीत करुन वार्षिक वेतनवाढीची गणना केली जाते .
समजा आपले मुळे वेतन हे 27100/- असे असेल तर , 27100 चे 3 टक्के रक्कम 813 येते , जर 27100 मध्ये 813 मिळविले तर 27913 अशी रक्कम येते , परंतु ही रक्कम 27950/- पेक्षा कमी असल्याने ही रक्कम 27900/- रुपये मध्ये रुपांतरित करुन पुढील वेतनवाढ मंजूर केली जाते जर , सदरची रक्कम ही 27950/- पेक्षा अधिकअसल्यास मुळ वेतन 28000/- अशी करण्यात आली असती .
सातव्या वेतन आयोगानुसार आपणांस मिळणारे सध्याचे मुळ वेतन व पुढील वेतनवाढ वेतन स्तर नुसार पाहु शकता , याकरीता आपणांस आपले वेतनस्तर ( पे – मॅट्रीक्स ) माहित असणे आवश्यक असणार आहेत . चार्ट पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.