Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 3072 teaching & non teaching staff anudan patra paripatrak ] : राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 24 जुन रोजी निर्गमित झालेल्या शासन परिपत्रकानुसार , राज्यातील 327 शाळा तर 3072 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी अनुदानास पात्र झालेले आहेत .
राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 06.02.2023 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या शाळा / तुकड्यांपैकी अनुदानासाठी पात्र / अपात्र ठरलेल्या शाळांची माहिती शासनांस सादर करण्यात आलेली आहे . तर दिनांक 24 जुन 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार प्रपत्र क मध्ये मुल्यांकन निकषानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेलया अघाषित शाळांचा गोषवारा सादर करण्यात आला आहे .
त्यानुसार राज्यातील 327 शाळा तर 487 वर्ग / तुकड्या / शाखा वरील 3072 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांपना अनुदानांस पात्र करण्यात आले आहेत . तरी अशा अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेचे नाव , पत्ता , शाळेच्या युडायस क्रमांक , मुल्यांकनानुसार प्राप्त एकुण गुण , वर्ग / तुकडी , वर्ग / तुकडीस मान्यता आदेश , मान्यता देण्यात आलेले वर्ग / तुकडीनिहाय वर्ष तसेच सन 2022-23 व सन 2023-24 च्या संच मान्यतेनुसार मंजूर शिक्षक व शिक्षकेत्तर पदांची माहिती
तसेच वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती , आरक्षण धोरणाचे पालन होते अथवा कसे , तसेच शिक्षण संचालक ( प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक ) यांची शिफारस इ. बाबींची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच या संदर्भात राज्य शासनांच्या शिक्षण संचालनस्तरावर दिनांक 25 जुन 2024 रोजी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांस परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.