Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ namo shetkari mahasanman yojana 4 th installment ] : नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 4 था हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे , याकरीता आजपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनांमध्ये अधिकृत्त निर्णय घेतले जाणार असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे .

केंद्रामध्ये मा.नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याच्या नंतर शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्त्यासाठी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले . तर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनांने सुरु केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 3 हप्ते खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत .

तर सदर योजनेचा 4 हप्ता प्रलंबित आहे , याबाबत आजपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनांमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे . यापुर्वी सदर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 रा व तिसरा हप्ता हा दिनांक 28 फेब्रुवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत . तर आता 4 था हप्त्यासाठी राज्य शासनांकडून हालचाली सुरु आहेत .

तसेच विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज्याचे कृषीमंत्री मा.धनंजय मुंडे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहेत कि , पावसाळी अधिवेशनांमध्ये सदर योजनेचा 4 था हप्ता अदा करण्यासाठी निधीची उपलब्धता झाल्यानंतर , तारीख निश्चित करण्यात येईल , असे नमुद करण्यात आलेले आहेत .

निधी उपलब्धता झाल्यास सदर योजनेचा 4 था हप्ता जुलै महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पेसै जमा होतील . विधानसभेची निवडणुका तोंडावर आल्याने , अशा बाबतचा निर्णय लवकरच राज्य शासनांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *