Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao new rain update 27 jun to 29 jun ] : राज्यांमध्ये दिनांक 27 जुन , 28 जुन व 29 जुन रोजी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे , याबाबत हवामान तज्ञ पंजाबरावांकडून नवा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . सदरचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

सध्या राज्यांमध्ये पाऊस भाग बदलून पडत आहे , तर पश्चिम महाराष्ट्रांमध्ये उन्हांचे प्रमाण कायम आहेत , तर पाऊस भाग बदलुन पडत आहे . तर मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाने सुट्टी घेतली असल्याने , शेतकरी चिंतेत होती , परंतु या भागांमध्ये पावसाची दमदार आगमन होणार असल्याचा अंदाज पंजाबरावांन व्यक्त करण्यात आला आहे . राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने , सदर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत .

हवामान तज्ञ पंजाबरावांनी दिलेल्या नविन अंदाजानुसार दिनांक 27 जुन ते दिनांक 30 जुन पर्यंत राज्यातील पुर्वी विदर्भ , मराठवाडा , तसेच पश्चिम विदर्भ , उत्तर महाराष्ट्र , कोकण या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तर उर्वरित राज्याच्या इतर भागांमध्ये देखिल पावसाचे प्रमाणे असणार आहेत , परंतु सदर पावसाचे प्रमाणे हे कमी असणार आहेत .

दिनांक 27 जुन , 28 जुन व 29 जुन रोजी राज्यातील या जिल्ह्यात पडणार जोराचा मुसळधार पाऊस : राज्यातील अमरावती , गोंदिया , भंडारा , नागपुर , वर्धा , अकोला , वाशिम , बुलढाणा , परभणी , जालना , बीड , जळगाव , नाशिक , नगर , धुळे , नंदुरबार , कोकण या भागांमध्ये वरील नमुद कालावधीत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबरावांनी व्यक्त करण्यात आलेला आहे .

मान्सुन राज्यात दिनांक 30 जुन पर्यंत अधिक सक्रिय असणार आहे , तर माहे जुलै महिन्यात दिनांक 04 जुलै नंतर जोरदार पावसाला पोषक परिस्थिती निर्माण होईल , असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *