Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ raju shetti karjmukti abhiyan] : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी याकरिता राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे . याकरिता दिनांक 01 जुलैपासून राज्यात कर्जमुक्ती अभियान राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे .

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची  राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक दिनांक 23 जून रोजी संपली असून , सदर बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न सरकार दरबारी मांडण्याकरिता मागणी पत्र राज्य सरकारला सादर करण्यात आले आहे , तसेच सदर बैठकीमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली आहे ..

सदर मागणी मान्य न केल्यास दिनांक एक जुलैपासून पुसद येथून कर्जमुक्ती अभियान सुरू करणार असल्याचे सांगितले आहे , संपूर्ण कर्जमाफीसह संपूर्ण विज बिल देखील माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..

संपूर्ण कर्जमाफी व विज बिलामध्ये माफी मिळावी , गाईच्या दुधाला लिटर मागे सात रुपये अनुदान मिळावे तसेच पाम तेल व सोयाबीन पेंडीच्या आयतीवर 40% कर लावावा जेणेकरून सोयाबीनला चांगला भाव मिळेल.  त्याचबरोबर कांदा निर्यातीवर शून्य टक्के करत असावा तसेच पाणीपट्टीवरील दहापट दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावे , तसेच कृषी पंपांना मीटर बसवण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा .  त्याचबरोबर रासायनिक खतांचे दर पुढील प्रमाणे करण्यात यावे , तसेच महिला बचत गटांचे कर्ज माफ करण्यात यावे ..

शेती साहित्यावरील जीएसटी परतावा शेतकऱ्यांना देण्यात यावा , पिक विम्याचे पैसे तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावे . अशा विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून राज्य सरकार समोर ठेवण्यात आली आहेत या मागण्या पूर्ण न केल्यास दिनांक एक जुलैपासून कर्जमुक्ती अभियान राबवली जाणार आहे..

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *