लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहेत . सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 वर्षे करणेबाबत केंद्र सरकारसह देशातील 25 राज्य सरकारने निर्णय घेवून अंमलात देखिल आणले आहेत . यामुळे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वयामध्ये ( Retirement Age ) आणखीण 02 वर्षांची वाढ होणे आवश्यक आहे .
सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची आवश्यकता : महाराष्ट्र शासन सेवेतील बहुतांश सरकारी नोकऱ्यासाठी शैक्षणिक अर्हता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . यामुळे पदवी उत्तीर्ण करण्यासाठी उमेदवारांस किमान 23 ते 25 वर्षे लागतात . त्यानंतर सध्याच्या स्पर्धेच्या युगांमध्ये तयारी करायची म्हटल्यास उमेदवार चक्क 30 ते 35 वर्षांनंतर सेवेत रुजु होताना दिसत आहेत .
शिवाय शासनांकडून रिक्त पदांवर महाभरती प्रक्रिया विहीत कालावधीत राबविली जात नाही , यामुळे काही उमेदवार चक्क कमाल वयोमर्यादेच्या वर्षे शासन सेवेत रुजु होतात . यामुळे अशा कर्मचाऱ्यांना खुप कमी सेवा मिळत असते , म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांना केवळ 15 ते 20 वर्षांची सेवा मिळत असते . म्हणून या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय वाढविल्यास दोन वर्षे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांसाठी जून महिना ठरणार वरदान , मिळणारे मोठे लाभ !
शासनांकडून काय आहे तरतुद : राज्य कर्मचाऱ्यांनी दि.14 मार्च 2023 रोजी केलेल्या राज्यव्यापी संपामध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी करण्यात आलेली आहे , या संपामध्ये जुनी पेन्शन ही प्रमुख मागणी होती , यामुळे जुनी पेन्शन व्यतिरिक्त अन्य मागणीसाठी राज्य शासनांकडून एक समिती गठित करुन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहेत .
तसेच जुनी पेन्शन योजना लागु करायची असल्यास , सेवानिवृत्तीचे वय वाढवावे असे मत तज्ञांकडुन व्यक्त करण्यात आलेले होते . यामुळे अभ्यास समितीकडून राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ अनुज्ञेय करणेबाबतच्या अहवालांमध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबत सकारात्मक विचार केला जावू शकते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !