Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ crop insurance amount publish ] : पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यानुसार पिकाच्या नुकसान करीता विमा रक्कम कृषी विभाग मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे .
पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत जिल्हांमधील सर्व तालुकानिहाय नुकसान झालेल्या पिकांसाठी विमा कवच व विमा हप्ता कृषी विभाग मार्फत जाहीर केला गेला आहे . सदरचे विमा संरक्षण शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये काढता आले आहेत . कृषी विभागांकडून जाहीर केलेल्या विमा संरक्षण कवच मध्ये भाताला सर्वाधिक प्रति हेक्टरी 51,760/- रुपये इतका विमा संरक्षण मिळाला आहे .
01 रुपयांमध्ये पीक विमा संरक्षणाचा लाभ घेण्याकरीता खरीब हंगामामध्ये सर्वसामावेशक पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली गेली असून , शेतकऱ्यांनी दिनांक 15 जुलै पर्यंत याबाबत नोंदणी करुन योजनेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन कृषी विभागांकडून करण्यात आले आहेत .
यांमध्ये पिकांची नैसर्गिक आपत्ती , कीड तसेच रोगासारख्या प्रतिकुल परिस्थीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानी करीता शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते . या विमा संरक्षण योजना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पिकनिहाय व तालुकानिहाय विमा रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे .
पिकांचे नावे | तालुका | विमा रक्कम (प्रति हेक्टरी) | विमा हप्ता |
भात | हवेली ,मावळ , हवेली , वेल्हा , जुन्नर , खेड , आंबेगाव , पुरंदर | 51,760/- | 1552.80/- |
बाजरी | हवेली , खेड , आंबेगाव , शिरुर , बारामती , इंदापुर , दौंड , पुरंदर | 24,000/- | 2640/- |
ज्वारी | आंबेगार , खेड , भोर , हवेली | 27,000/- | 4860/- |
नाचणी | मुळशी , आंबेगाव , वेल्हा , खेड, भोर | 20,000/- | 800/- |
तुर | शिरुर , बारामती , इंदापुर | 35,000/- | 7350/- |
मूग | शिरुर | 20,000/- | 5000/- |
उडीद | शिरुर | 20,000/- | 5000/- |
भुईमुग | शिरुर , आंबेगाव , मावळ , वेल्हा , जुन्नर , खेड , मुळशी , हवेली | 40,000/- | 3200/- |
सोयाबीन | आंबेगाव , मावळ , बारामती , खेड , जुन्नर , इंदापुर | 49,000/- | 3920/- |
कांदा | बारामती , इंदापुर , दौंड , पुरंदर | 80,000/- | 6400/- |
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !