Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mansun rain update news ] : राज्यांमध्ये मान्सुनची कामगिरी अत्यंत खराब कामगिरी दिसून येत आहे . तर राज्यात जोरदार पावसाला कधीपासुन सुरुवात होईल , याबाबत हवामान खात्यांच्या शास्त्रज्ञांकडून नवा अंदाज जाहीर केला आहे . शास्त्रज्ञ नेमके काय सांगतात ते पुढीप्रमाणे पाहुयात ..

यंदाच्या वर्षी राज्यात मान्सुनची गैरहजरी मोठ्या दिवसांपासून दिसून येत आहे , सध्या राज्यात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहेत , काही ठिकाणी अद्याप पर्यंत मोठा पाऊस पडलाच नाही , त्यामुळे शेतकरी  पेरणी करण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतिक्षा करीत आहेत . तर काही भागांमध्ये पेरणी करुन पावसाची प्रतिक्षा करीत आहेत .

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , राज्यांमध्ये दिनांक 23 जुन पासुन पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , परंतु राज्यांमध्ये सर्वत्र भागांमध्ये 26 जून ते दिनांक 30 जुन दरम्यान जोरदार पाऊस पडणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

तर दिनांक 26 जुन ते 30 जुन दरम्यान जोराचा पाऊस झाल्यानंतर ज्या भागांमध्ये पाऊस झाला नाही अशा भागांमध्ये पेरणी करण्यास हरकत नसल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव यांनी सुचित केले आहेत . तर ज्या भागांमध्ये पेरणी झालेली आहे , अशा ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरणार आहे .

तर ज्या भागांमध्ये अद्याप पेरणी झालेली नाही , अशा ठिकाणी 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नयेत असे आव्हान कृषी विभागांकडून करण्यात आलेले आहेत .

पुढील महीन्यांत या तारखेला पडणार जोराचा पाऊस : राज्यांमध्ये पुढील महिन्यांत दि 10 जुलै ते दिनांक 15 जुलै या कालावधीमध्ये तर पुढे दिनांक दिनांक 19 जुलै ते दिनांक 26 जुलै या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजावराव डख यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *