Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan yojana 17th installment ] : बऱ्याच दिवसांपासुन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्ता अदा करणे बाकी होते , परंतु केंद्रामध्ये मोदीने तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत 17 वा हप्त्याचे वितरण करण्यात आले आहेत .
ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत 17 व्या हप्त्याचे रुपये 2000/- मिळाले आहेत , अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान योजनेचा 17 वा हप्त्याचे रुपये 2000/- तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत . आशा आहे कि आपणांस शेतीच्या गरजा पुर्ण करण्यास याची मदत होईल ..आपला नरेंद्र मोदी अशा प्रकारचे संदेश आलेले आहेत .
दिनांक 18 जुन 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील तब्बल 9.26 करोड लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रुपये 20,000/- करोड इतकी रक्कम हस्तांतरीत करण्यात आली आहे .
यामुळे ज्या शेतकऱ्यांना सदर 17 वा हप्ता मिळाला आहे , अशांना पेरणीकरीता बियाणे , खते खरेदी करण्यास मदत होणार आहे . तर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पुर्ण केली नाही , अशा शेतकऱ्यांना सदर 17 व्या हप्त्यांपासुन वंचित रहावे लागले आहेत . तर ज्या शेतकऱ्यांना सदर 17 वा हप्ता प्राप्त झालेला नाही . अशा शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून आपली ई-केवायसी पुर्ण आहे कि नाही याबाबत Know Your Status या ऑप्शनवर आपले स्टेटस चेक करु शकता ..
शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर कॉर्नरमध्ये ई-केवायसी , नविन फार्मर नोंदणी , ई-केवायसी सद्यस्थिती , लाभार्थी यादी , नावांमध्ये बदल ( आधार कार्ड नुसार ) , ऑनलाईन परतावा इत्यादी ऑप्शन नमुद करण्यात आलेले आहेत .