Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State employee retirement Age & mahagai Bhatta vadh increase update ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढीसह महागाई भत्तांमध्ये देखिल वाढ होणार आहे , याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहेत .
सेवानिवृत्तीच वय वाढणार ? : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापुर्वीच्या झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक आश्वासन दिले होते , तसेच नुकतेच महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर चर्चा करण्यात आली . सदर मागणींवर पावसाळी अधिवेशनांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे .
देशांमध्ये 25 राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यात आलेले आहेत , त्याच पार्श्वभुमीर राज्य कर्मचारी निवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करण्याची मागणी करत असल्याने , सदर मागणीवर राज्य शासनांकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जावू शकतो . या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला आश्वासित करण्यात आले आहेत .
निवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे सादर : तसेच दिनांक 10 जुन 2024 रोजी महासंघाची राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य 25 राज्यांप्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी केली , यावर मा.मुख्य सचिव बोलताना सांगितले कि , प्रशासन स्तरावरुन याबाबतचा अधिकृत्त प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे सादर करण्यात आलेला असून त्यांच्या मान्यतेनंतर यावर त्वरील निर्णय घेण्यात येईल असे नमुद करण्यात आले .
महागाई भत्ता वाढ : वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ हा राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यांमध्ये प्राप्त होईल , दिनांक 27 जुन पासून राज्याचे पावसाळी अधिवेशास सुरुवात होत असून , या अधिवेशनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणींचा विचार केला जाणार असून , यांमध्ये 50 टक्के प्रमाणे डी.ए वाढीचा निर्णय निर्गमित केला जाईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.