Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post office Double Money investment plan ] : भारतीय डाक विभागामार्फत दामदुप्पट योजना राबविण्यात येते , ज्यांमध्ये आपण जर 5 लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास आपणांस मुदतीनंतर 10 लाख रुपये मिळणार आहेत . या योजनाबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

भारतीय डाक विभागातील गुंतवणुक ही सर्वाधिक जोखिम मुक्त असते , तसेच यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सर्वाधिक व्याजदर मिळतो , यामुळे देशांमध्ये भारतीय डाक विभागांमध्ये गुंवणुक करण्याचे प्रमाण अधिक आहे . तसेच ज्येष्ठ नागरिक , महिलांसाठी यांमध्ये आकर्षक व्याजदर मिळतो , यामुळे भारतीय डाक विभाग गुंतवणुकीचा सर्वात उत्तम पर्याय मानले जाते .

दाम दुप्पट योजना : भारतीय डाक विभागांकडून दाम दुप्पट योजना राबविण्यात येते , ज्याला किसान विकास पत्र योजना असे संबोधले जाते . जे कि व्याजदरांनुसार काही महिन्यांच्या अवधीनंतर आपली गुंतवणुक रक्कम दुप्पट होते . या योजनांमध्ये आपण किमान 1000/- रुपयांपासुन पुढे 100/- रुपयांच्या पटीत अमार्यादित रक्कम गुंतवणुक करु शकता .

यांमध्ये एकल व्यक्ती तसेच दुहेरी खाती उघडता येते , तर ज्यांचे वय हे 10 वर्षांपेक्षा जास्त आहे , अशा मुलांच्या नावे देखिल सदर खाते उघडता येते . तर एक व्यक्ती या योजना अंतर्गत कितीही खाते उघडू शकते .

मुदत / व्याजदर : किसान विकास पत्र योजना अंतर्गत चालु आर्थिक वर्षांमध्ये 7.5 टक्के इतका व्याजदर मिळतोत , तर याची मुदत ही 115 महिन्यांची ( 10 वर्षे 4 महिने ) मुदत आहे .ज्यांमध्ये आपली मुदत रक्कम दुप्पट होते . जर आपण या योजनांमध्ये 5 लाख रुपयांची गुतवणुक केल्यास , आपणांस 115 महिन्यांच्या मुदतीनंतर 10 लाख रुपयांचा परतावा मिळेल .

लाभ कसा घ्याल : या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी , आपणांस आपल्या नजिकच्या डाक कार्यालयांमध्ये जावून सविस्तर आवेदन करुन लाभ घेवू शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *