Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Crop insurance news ] : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी 13600/- मिळणार आहेत , याकरीता केंद्र सरकारकडून निधींची तरतुद करण्यात येत असल्याची मोठी अपडेट समोर येत आहेत .
माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यात ज्या भागांमध्ये अतिवृष्टी व पुरांमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहेत , अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600/- रुपये पर्यंत नुकसान भरपाईची तरतुद करण्यात येत आहे .याकरीता राज्य शासनांकडून एकुण 1200 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . ज्यांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कमाल 13,600/- रुपये पर्यंत नुकसान भरपाईची तरतुद करण्यात येईल .
सदर नुकसान भरपाईची रक्कम ही राज्यातील शेतकऱ्यांना विभागीय आयुक्त कार्यालये पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत वितरण केले जाणार आहेत .तर सदरची निधी ही राज्यपाल यांच्या प्रतिसाद निधी व राज्य सरकारच्या निधीमधून निश्चित करण्यात आलेल्या दराने सदर कृषी पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यात येणार आहे . याकरीता कृषी विभागांकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी तयार करण्यात आलेली आहे , तर सदर नुकसान भरपाईची रक्कम लवकरच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केले जाणार आहेत .
यांमध्ये नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत रक्कम अदा करण्यासाठी प्रति हेक्टरी कमाल 13,600/- रुपये कमाल 3 हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे . सदर वरील नमुद कालावधीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरीता राज्य शासनांकडून महत्वपुर्ण दिलासा देण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या कृषी विभागांकडून नुकसान ग्रस्त जिल्हे , तालुके व गावनिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची यादी लवकरच जाहीर करण्यात येवून , पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सदर नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात येईल . यामुळे शेतकऱ्यांना खरीप खंगामध्ये बीयाणे , खतांच्या खरेदीसाठी दिलासा मिळणार आहे .