Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ District Forecast & Warnings upto 19 jun ] : प्रादेशिक मौसम केंद्र कोलाबा ,मुंबई हवामान खात्यांकडून दिनांक 19 जुन पर्यंत राज्यातील जिल्हानिहाय हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . जिल्हानिहाय हवामान अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात ..

कोकण विभाग : कोकण विभागातील पालघर , ठाणे , मुंबई , रायगड या जिल्हांमध्ये दिनांक 19 जुन पर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे . तर रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दिनांक 17 जुन रोजी मध्यम पाऊस तर दिनांक 18 व 19 जुन रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

नाशिक विभाग : नाशिक विभागांमध्ये आज रोजी विजेच्या कडाक्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे . यावेळी वाऱ्याचा वेग हा 40 -50 km प्रतितास इतका असणार आहे . , तर दि.17 ते 19 जुन पर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे .

पुणे विभाग : पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये दिनांक 17 जुन पर्यंत विजेच्या कडाक्यांसह पाऊस असणार आहेत , तर 18 जुन रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे . तर 19 जुन रोजी सातारा मध्ये मुळसधार पाऊस पडेल , तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

मराठवाडा : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 17 जुन पर्यंत विजेच्या कडाक्यांसह मुसळधार पाऊसाची शक्यता आहे , तर 18 व 19 जुन रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

विदर्भ ( अमरावती / नागपुर ) : विदर्भातील संपुर्ण जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडाक्यांसह दिनांक 19 जुन पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ,तर यावेळी वाऱ्याचा वेग हा 30-40 किमी प्रति तास इतका असणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *