LPG गॅस सिलेंडरवर मोठी बचत ; मिळत आहे तब्बल 300/- रुपये पर्यंत सबसिडी – जाणून घ्या सविस्तर माहिती !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LPG Gas Cylinder Subsidy ] : एलपीजी गॅस सिलेंडरवर मोठी बचत होवू शकते , याकरीता आपणांस सरकारी योजनांच्या माध्यमातुन आवेदन सादर करावे लागणार आहेत .यांमध्ये महिलांच्या नावे घरगुती गॅस कनेक्शन घेवू शकता . सदर कनेक्शनचे दर देखिल कमी असते , व प्रत्येक गॅस सिलेंडरवर सबिसिडी देखिल दिली जाते .

सरकारी योजनांतुन मिळवा 300/- रुपये गॅस सबसिडी : केंद्र सरकारकडून गॅस सबसिडी अनुदानांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे . सध्या प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत 300/- रुपये सबसिडी दिली जाते . या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी आपले कनेक्शन हे उज्वला योजनांच्या माध्यमातुन घेतलेले असणे आवश्यक आहे .याकरीता विहीत नमुन्यात आवेदन सादर करावे लागेल , तरच सबसिडीचा लाभ मिळेल .

सबसिडी साठी नविन अपडेट : ज्यांना प्रधानमंत्री उज्वला योजनांच्या माध्यमातुन सबसिडी मिळत होती , अशांना ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करायची आहे , तरच अशांना सबसिडीचा लाभ मिळणार आहे . याकरीता आपल्या गॅस कनेक्शन असणाऱ्या सेंटरला भेट देवून ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करायची आहे .

सबसिडी प्राप्तीसाठी विशेष लक्ष : आपले कनेक्शन उज्वला योजनांच्या अंतर्गत असून बऱ्याच वेळा सबसिडी मिळत नाही . ज्यांनी गॅस बुकींग करणे ( ऑनलाईन / फोन बुक ) करणे टाळले असेल , अशा वेळी त्यांना सबसिडील मिळत नाही . यामुळे प्रत्येक वेळी गॅस सिलेंडर घेताना , बुकिंग करणे आवश्यक असेल .

केंद्रामध्ये मोदींची तिसऱ्यांदा सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर देशातील सर्वसामान्यांसाठी फायदा व्हावा याकरीता सन 2024-25 या वर्षाकरीता सबसिडी मध्ये वाढ करुन 300/- रुपये इतकी करण्यात आलेली आहे .

Leave a Comment