Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Mansun update news ] : सध्या राज्यांमध्ये मान्सुनचा वेग कमी झालेला असून , आगामी काळांमध्ये पावसाचा जोर अधिकच ओसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला आहे .

राज्यांमध्ये सुरुवातीच्या काळांमध्ये मान्सुनची जोरदार सुरुवात झाली , त्यानंतर सध्य स्थितीमध्ये पावसाचा जोर मंदावला आहे , तर पुढील काही काळांमध्ये देखिल पावसाचा जोर कमीच राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे ज्यांने पेरणी केली आहे , अशा शेतकऱ्यांना चिंतेची बाब असणार आहे .

राज्यांमध्ये मान्सुनच्या आगमनानंतर पहिल्या आठवड्यांमध्ये जोराचा पाऊस झाला तर , दुसऱ्या आठवड्यांपासुन पावसाचा जोर अधिकच कमी झाला आहे . भारतीय हवामान खात्यांकडून दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मौसमी वारे हे जळगाव , अमरावती भागांमध्येच असून , ते वारे पुढे सरकले नाहीत , यामुळे मान्सुनचा वेग मंदावला आहे .

बंगालच्या उपसागरावरुन सक्रिय होणारे नैऋत्य मौसमी वारे मागील 05 दिवसांपासून मंदावले असल्याने , राज्यातील कोकण , पश्चिम महाराष्ट्रांमध्ये पावसाचे प्रमाणे अधिकच कमी झालेले आहेत . यामुळे पावसा-अभावी राज्यांमध्ये वातावरण अधिकच उकाडा झालेला असून , नागपुर , मुंबई शहराचे तापमान अजून देखिल 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे .

तर राज्यांमध्ये मराठवाडा व कोकणमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने , तेथील शेतकऱ्यांनी पेरणीचे काम जवळपास पुर्ण झाले आहे . परंतु हवामान खात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काळांमध्ये पावसाचा वेग मंदावर आहे , तर जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यांपासून राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोराच्या पावसाला सुरुवात होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *