Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee New pay commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन / भत्ते तसेच पेन्शन व इतर लाभांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडून तात्काळ नविन वेतन आयोगाची ( 8 व्या वेतन आयोगाची ) स्थापना करणेबाबत केंद्रीय कॅबिनेट सचिव यांना अधिकृत पत्र सादर करुन निर्देश देण्यात आलेले आहेत .

सरकारी कर्मचाऱ्यांकडून नविन वेतन आयोग तसेच पेन्शन मध्ये सुधारणा व महागाई भत्ता अशा विविध बाबींकरीता संप पुकारण्यात आला होता , यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून नविन वेतन आयोगाची तात्काळ स्थापना करण्यात यावी , ज्यांमध्ये 3.68 पट फिटमेंट फॅटमेंट फॅक्टर प्रमाणे , किमान मुळ वेतनांमध्ये वाढ करण्यात यावी , असे नमुद आहेत .

सातव्या वेतन आयोगानुसार , केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मुळ वेतनात वाढ करण्यात आली आहे , ज्यामुळे किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये इतके आहेत , तर आता नविन वेतन आयोगांमध्ये 3.68 पट फिटमेंटच्या मागणीनुसार किमान मुळ वेतन हे 26,000/- रुपये इतके होईल , याकरीता डॉ.आयक्रोयड फॉम्युला / आयएलसी मानदंड आधारे वेतन / पेन्शन वाढीची गणना केली जाते .

महागाई भत्ता बाबत विशेष : सरकार मार्फत 4 टक्के ते 7 टक्के च्या श्रेणीत महागाई जाहीर होते  , परंतु कर्मचाऱ्यांना केवळ 3 ते 4 टक्के अशी डी.ए वाढ लागु केली जाते , कोरोना काळांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता अद्याप पर्यंत प्रलंबित आहे , कोरोना महामारीनंतर सरकारच्या महसुलांमध्ये 100 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली असली तरी देखिल सदर 18 महिने कालावधीमधील डी.ए बाबत अद्याप उचित निर्णय घेण्यात आला नाही , याकरीता केंद्र सरकारमार्फत निर्णय होण्याची मागणी आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीनुसार अपेक्षित असणारा 8 वा वेतन आयोगाची स्थापना तात्काळ करण्याची तसेच केंद्राच्या वेतनश्रेणी / पेन्शन तसेच भत्ते आणि इतर लाभांमध्ये सुधारण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेवून तात्काळ नविन वेतन आयोग समितीचे गठण करण्याची निर्देश सदर पत्रांमध्ये देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सविस्तर पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

सविस्तर पत्र (PDF)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *