Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PM insurance scheme shasan nirnay ] : प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राज्यात सन 2024-25 व सन 2025-26 या वर्षांमध्ये मृग व आंबिया बहाराकरीता अधिसुचित फळपिकांना लागु करणेबाबत राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 12 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार , पीएम पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2024-25 व सन 2025-26 या 02 वर्षांसाठी मृग बहारांमध्ये संत्रा , चिकु , लिंबु , पेरु , मोसंबी , डाळिंब , सिताफळ , द्राक्ष या आठ फळपिकांसाठी व आंबिया बहारांमध्ये मोसंबी , संत्रा , काजु , डाळिंब , आंबा , केळी , द्राक्ष प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या 9 फळपिकांसाठी लागु करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे .

सदरचा शासन निर्णय हा सन 2024-25 व सन 2025-26 या दोन वर्षांमध्ये निर्णयांमध्ये नमुद केलेल्या जिल्ह्यांमधील तालुक्यातील महसुल मंडळात सहपत्र – 2 मध्ये निर्धारित केलेल्या हवामान धोक्यानुसार लागु करण्यात येत आहेत . सदर योजना कार्यान्वित करणाऱ्या विमा कंपन्या देखिल सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत .

योजनेची उद्दिष्टे : सदर योजनेची प्रमुख उद्दिष्टे म्हणजेच नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकृल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास , शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे , तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे , तसेच शेतकऱ्यांना नाविन्यपुर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे , व कृषी शेतकऱ्यांना जोखमीपासुन संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतु साध्य करणे .

विमा संरक्षणाचे अधिसुचित फळ पिके व उत्पादनक्षम वय ( वर्षे पुढीलप्रमाणे पाहु शकता ) ..

अ.क्रअधिसुचित फळ पिकेउत्पादनक्षम वय ( वर्षे )
01.चिकु05
02.आंबा05
03.काजु05
04.लिंबु04
05.संत्रा03
06.मोसंबी03
07.सिताफळ03
08.पेरु03
09.द्राक्ष02
10.डाळिंब02

मृग बहार फळपिक निहाय हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आंबिया बहार मध्ये फळपिक निहाय हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

या संदर्भात राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 12 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *