Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State New Pay Scale Commission GR ] : राज्य वेतन सुधारणा समिती समिी 2017 च्या शिफारशीनुसार शासनांच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मुळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे तसेच सुधारित वेतन स्तरांमध्ये वेतन निश्चिती करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 12 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या दिनांक 22.02.2024 रोजीच्या शासन परिपत्रकातील क्र.02 च्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत 01 जानेवारी 2016 रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागु होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्याच्या नंतर या वाक्याऐवजी “01.01.2016 रोजी व तदनंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर “ असे वाक्य वाचण्यात यावे .
तसेच क्र.02 च्या पृष्ठावर पाचव्या ओळीत दिनांक 01 जानेवारी 2016 रोजीच्या पुढे किंवा तदनंतर या शब्दांचा समावेश करण्यात यावा असे नमुद करण्यात आलेले आहे .सदर शासन शुद्धीपत्रकांमध्ये शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2023 नुसार पुर्वीच्या वेतनस्तरात निश्चित होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विकल्पाचा नमुना पुढीलप्रमाणे पाहता येईल .
जर आश्वासित प्रगती योजनेनंतर देय होणाऱ्या पहिल्या / दुसऱ्या / तिसऱ्या लाभानुसार लागु होणाऱ्या वेतनस्तरात दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी वेतननिश्चिती करण्यात आली आहे . व दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी शासन अधिसुचना दिनांक 30 जानेवारी 2019 नुसार वेतननिश्चिती केल्यास , व तदनंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजना अंतर्गत देय होणाऱ्या पहिल्या / दुसऱ्या / तिसऱ्या लाभानुसार वेतननिश्चिती केल्यास , पुर्वीच्या वेतनस्तरात निश्चित होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित होत आहे .
तर राज्य शासनांच्या वित्त विभाग शासन परिपत्रक क्र.1123 दिनांक 22.02.2024 नुसार दिलेल्या सुविधेनुसार सदर विकल्प भरुन सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.