Live Mrathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain Update News ] : राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मान्सुनने हजेरी लावली आहे , तर विदर्भातील काही भागांपर्यंत अद्याप मान्सुन पोहोचला नाही , तर राज्यातील इतर भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी सुरु आहे . तर जुन महिन्यापर्यंत कोणत्या ठिकाणी पाऊस पडेल ,याबाबतचा हवामान अंदाज पुढीलप्रमाणे आहे .
राज्यांमध्ये उद्या दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्र भागाच्या बहुतांश ठिकाणी पावसाची दमदार हजेरी लागेल , तर पुढील 02 दिवसांमध्ये उत्तर कोकणांसह मध्य व उत्तर महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी त्याचबरोबर मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे .
राज्यांमध्ये दिनांक 23 जुन पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , त्यानंतर 23 जुन नंतर राज्यांमध्ये विदर्भ व मराठवाडा मध्ये केवळ ढगाळ वातारवण व पावसाच्या बारीक सरी सुरु राहतील असा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला आहे .
तर पुढे जुलै महिन्यांमध्येच पावसाला सुरुवात होईल , असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . माहे जुन महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस हा उतार होणार आहे . सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसांने दमरार हजेरी लावत आहे , मराठवाडा व विदर्भातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावस पडत आहे .
दिनांक 23 जुन पर्यंतच्या पावसाने पेरणी केल्यास काही हरकत राहणार नाही , मराठवाडा व कोकण , पश्चिम महाराष्ट्रांमध्ये पेरणीला सुरुवात झालेली आहे , तर विदर्भातील बऱ्याच ठिकाणी पेरणी होणे बाकी आहेत , अशा शेतकऱ्यांनी 23 जुन पर्यंत वाट पाहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .